म. जा.न्युज नेटवर्क
एरंडोल: येथे पंचायत समिती सभागृहात पुरवठा विभाग व तहसील कार्यालय एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम व जलद निपटारा या संकल्पनेस अनुसरून २४ डिसेंबर २०२५रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एरंडोल चे नवनियुक्त तहसीलदार गोपाळ पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर शिवाजीराव अहिरराव, नुरुद्दीन मुलाजी, व्ही.के.मोरे, कैलास महाजन, उज्वला देशपांडे, जयश्री पाटील, रश्मी दंडवते, सरला लहू पाटील याप्रमाणे मान्यवर तसेच ग्राहक कल्याण फाउंडेशन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू व रास्त भाव धान्य दुकानदार तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये उज्वलाताई देशपांडे यांनी यावर्षीच्या संकल्पनेवर सखोल मार्गदर्शन केले. व्ही के मोरे, शिवाजीराव अहिरराव , रवी पाटील, जयश्री पाटील यांनी ग्राहक हक्क संरक्षण याबाबत प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश पांडे यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विवेक वैराळकर पुरवठा निरीक्षक 
अधिकारी एरंडोल,वैशाली पाचपोर पुरवठा निरीक्षक एरंडोल, ऋषीप्रसाद पोळ, निरज सुरळकर पुरवठा लिपिक यांनी सहकार्य केले.
