म.जा.न्युज नेटवर्क
जळगाव: येथे १ मार्च २०२६ रविवार रोजी भोई समाज युवा फाऊंडेशन तर्फे जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व सामाजिक कार्य करणाऱ्या समाजासाठी विषेश योगदान देणाऱ्या सारथी बांधवांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक व फाऊंडेशन चे अध्यक्ष यशवंत शिवदे, सचिव महारु शिवदे,साहेबराव मोरे यांनी एरंडोल येथील समाज भूषण अशोक मोरे यांचा जळगाव महापालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी, आमदार राजू मामा भोळे यांचे सुपुत्र नगरसेवक विशाल भोळे, नगरसेवक किरण शिवदे, नगरसेवक अतुलभाऊ बारी, मुक्ताईनगर चे नगरसेवक छोटू भोई ,भोई समाजाचे जिल्हा अध्यक्ष एस.ए.भोई यांच्या हातून व समस्त जिल्ह्यातील समाज बांधवांच्या उपस्थितित विशेष गौरव करण्यात आला
.
