दगडफेक व युवकास मारहाण केल्याप्रकरणी एरंडोल शहर तेली समाजातर्फे पोलिस प्रशासनास देण्यात आले निवेदन
तर शहरात पोलीसांचे पथसंचलन..!
एरंडोल: येथे एका गटातील युवकांनी घरात प्रवेश करत एका युवकास जबर मारहाण केल्याप्रकरणी एरंडोल शहर तेली समाजातर्फे बुधवारी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांना निवेदन देण्यात येऊन याप्रकरणी अजून ८ते १० आरोपींना अटक करण्यात यावी तसेच मारहाण झालेल्या युवकास पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान,
पोलिसांवरील हल्ला प्रकरणी तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत व लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल अशी माहिती पोलिस पोलिस सूत्रांनी दिली. शहरातून सायंकाळी पोलिसांचा रुट मार्च काढण्यात आला.
अशोक चौधरी, अनिल चौधरी, गुलाब चौधरी, आर.पी. चौधरी,विलास चौधरी, दशरथ चौधरी, सुनिल चौधरी, संजय चौधरी, श्याम चौधरी, आनंदा चौधरी व सर्व समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी निवेदन स्विकारले.
रूट मार्च मध्ये एस.आर.पी जवान, दंगा नियंत्रण पथकासह पोलिस निरीक्षक सतीश गोराडे,सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल आदी पोलिस अधिकारी सहभागी झाले.
दिवसभर शहरात शांतता होती.