एरंडोल: तालुक्यातील रवंजे बु! येथे दोन गटात किरकोळ कारणावरून मारहाण होऊन एका गटाकडून फायटर ने मारहाण करण्यात आली.याप्रकरणी परस्परविरुद्ध तक्रारी एरंडोल पोलिस स्टेशन ला नोंदविण्यात आल्या आहेत.
राजू तापीराम देशमुख याने केलेल्या तक्रारीनुसार पंकज कोळी, राजू कोळी, राकेश कोळी, हिरालाल कोळी,मोहन कोळी या आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून देशमुख यांचा मुलगा महेंद्र याला छातीवर फायटर ने मारहाण केली तसेच महेंद्र देशमुख व शांताराम देशमुख यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
दुसऱ्या तक्रारीत राजू तापीराम देशमुख, गोकुळ देवराम देशमुख, महेंद्र राजू देशमुख, समाधान भगवान देशमुख, लोकेश गोकुळ देशमुख यांनी फिर्यादी राजेंद्र कोळी व त्याचा भाऊ दिलीप कोळी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली
याप्रकरणी पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील व जुबेर खाटीक हे करीत आहेत.