म.जा.न्युज नेटवर्क
जळगाव: शहरातील भुसावळ रोड वरील चांडक हॉस्पिटल मागील गोल्ड सीटी येथे वास्तव्यास असणाऱ्या कुंदन भटू सोनी यांच्या घराच्या बाल्कनी ची खिडकी तोडून घरातून ७५हजारांचा मुद्देमाल तसेच २मोबाइल- अंदाजित किंमत १लाख ३४हजार असा ऐवजावर डल्ला मारल्याप्रकरणी एम.आय.डी.सी पोलिस स्टेशन ला भा.न्याय.संहिते च्या कलम ३३१(४)३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हेगारांवर शहादा जि.नंदुरबार येथे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल असून सुनिल बारेला याचेवर चोपडा, मलकापूर, जळगाव, एरंडोल, शहादा येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तर सुरेश बारेला याचेवर चोपडा व शहादा पोलिस स्टेशन ला २गुन्हे दाखल असल्याने या गुन्ह्यातील आरोपींनीनी चोरलेले मोबाईल कोणताही कॉल न करता वापरत असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. मात्र तरीही त्याअनुषंगाने एम.आय.डी.सी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक निरिक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पो.हे.कॉ.दत्तात्रय बडगुजर,पो.नाईक योगेश बारी, पो.कॉ.गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर व राहूल घेटे यांच्या पथकाने तांत्रीक कौशल्य पणाला लावून व भौतिक विश्लेषण करुन १)प्रविण दारासिंग पावरा वय २१ वर्षे रा. हिवरखेडा ता.शिरपुर जि.धुळे २) सुनिल अमरसिंग बारेला वय २४वर्षे रा.गवऱ्यापाडा ता.चोपडा जि.जळगाव ३) सुरेश राजाराम बारेला वय २२वर्षे रा.दुगणी ता.वरला जि.बडवानी, मध्यप्रदेश या तीनही आरोपींना चोपडा शहर व वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या तसेच दोन्ही मोबाइल आरोपींकडून जप्त करण्यात आले.