सामाजिक
-
शास्त्री फार्मसीत महापरिनिर्वाण दिनी ‘ज्ञानमहासागरास, वाहण्यात आली आदरांजली..!
म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: तालुक्यातील पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त शास्त्री इन्स्टिट्युट चे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी आदरांजली वाहिली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. शास्त्री यांनी सांगितले की येवढ्या बिकट परिस्थितीत सुद्धा बाबासाहेबांनी एवढे उच्च शिक्षण घेऊन समाज प्रबोधन केले हा…
Read More » -
शास्त्री फार्मसी इन्स्टिट्युट तर्फे एड्स जनजागृती रॅली चे आयोजन..!
म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: तालुक्यातील पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत ०६ डिसेंबर २०२४ रोजी शासकीय ग्रामीण रुग्णालय एरंडोल यांच्या सैयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामीण रुग्णालय एरंडोल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक जाधव होते, कार्यक्रमाच्या सुरवातीला वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल वानखेडे यांनी जनजागृति प्रभात फेरीस रवाना केले. शास्त्री फार्मसिच्या सर्व विद्यार्थ्यांनी व…
Read More » -
शास्त्री इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीत संविधान दिवस साजरा..!
म.जा.न्युज नेटवर्क एरंडोल: तालुक्यातील पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीत २६नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु असल्याने, प्रत्येक प्रात्यक्षिक वर्गात स्वतंत्रपणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रा.करण पावरा यांनी केले तसेच भारतीय संविधानाप्रति एकनिष्ठतेची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य…
Read More » -
एरंडोल येथे गुलालाची उधळण व ढोल ताश्यांच्या गजरात गणपती बाप्पा ला निरोप..!
म.जा.न्युज नेटवर्क एरंडोल: गुलालाची उधळण व ढोल ताशांच्या निनादात मंगळवारी रात्री १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी कासोदा दरवाजा परिसरात अंजनी नदीपात्रात गणपती विसर्जन करुन बाप्पा ला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. सायंकाळी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी जयगुरू व्यायाम शाळेचा मानाचा गणपती होता. गणेश मंडळांचे कार्यकर्ते वाद्यांच्या तालावर थिरकत होते. अमळनेर दरवाजा,नागोबा मढी,…
Read More » -
एरंडोल तालुक्यातून ७९ समाजउपद्रवी तीन दिवसांसाठी हद्दपार..!
म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: गणपती विसर्जन मिरवणूक (अनंत चतुर्दशी) व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने एरंडोल तालुक्यातील व शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वधर्मीय सण उत्सव शांततेत पार पडावेत याकरिता एरंडोल तालुक्यातील ७९ उपद्रविंना दिनांक १७सप्टेंबर ते १९ सप्टेंबर असे तीन दिवस हद्दपार करण्यासाठी एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) यांना प्रस्ताव…
Read More » -
एरंडोल व कासोदा या लोकसंख्याबहुल गावांचा पाणीप्रश्न सुटणार..!
म .जा.न्युज नेटवर्क एरंडोल: गिरणा नदीच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून अंजनी धरणाचे पुनर्भरण सुरु असून सद्यस्थितीत ६१टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झालेला आहे त्यामुळे एरंडोल व कासोदा या मोठ्या गावांच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीव्रतेने जाणवणारी पाणीटंचाई ची समस्या आगामी उन्हाळ्यात जाणवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण गेल्या वर्षी ‘अंजनी, त पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता.…
Read More » -
एरंडोल येथे शिवरात्री निमित्त भाविकांना तीन टन उसाचा रस वितरीत..!
महाराष्ट्र जागर न्युज नेटवर्क (रघुनाथ एस. निकुंभ) एरंडोल: येथे जय बाबाजी भक्त परिवारातर्फे महाशिवरात्री उत्सव विवीध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजे पर्यंत जवळपास तीन टन उसाचा रस भाविकांना मोफत वाटप करण्यात आला. सुमारे ११हजार भाविक- भक्तांनी लाभ घेतला. एरव्ही सर्वत्र प्रसाद म्हणून साबुदाणा फराळ वाटप केली जात होती मात्र तप्त उन्हात उसाच्या रसाचे प्रसाद…
Read More » -
मे. इंजिनियरिंग व ए.के एंटरप्रायजेस यांनी केलेल्या कामाचे ऑडिट करावे – सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांची ऑनलाईन तक्रार..!
महाराष्ट्र जागर न्युज नेटवर्क जळगाव: येथील सामाजिक व विख्यात असे माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार पी.गुप्ता यांनी मे. इंजिनियरिंग व ए.के.एंटरप्रायजेस कंपनी या दोन्ही कंपन्या एकाच मालकाशी संबंधीत असून या दोन्ही कंपन्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचे लेखापरीक्षण करावे अशी ऑनलाईन तक्रार ९ फेब्रुवारी २०२४ रोजी केली आहे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ऑनलाईन तक्रारीत म्हटले आहे की, महावितरण, जळगाव परिमंडळात असलेल्या…
Read More » -
एरंडोल तहसील कार्यालयाची जूनी ब्रिटिशकालिन इमारत होणार इतिहासजमा, नविन सुसज्ज इमारत होणार..!
एरंडोल: ब्रिटिशांच्या कारकीर्दीत १३२ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली येथील तहसील कार्यालयाची तत्कालीन दगड व चून्यात बांधण्यात आलेली इमारत जमीनदोस्त होणार असून त्या जागेवर नविन अद्ययावत व सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार आहे. दरम्यान, तहसील कार्यालयातील सर्व दप्तरे व फर्निचरसह संपूर्ण तहसील कार्यालय राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात टेलिफोन एक्सचेंज च्या इमारतीत स्थलांतरील होणार आहे. नविन इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास…
Read More » -
एरंडोल येथे भराव पूलाचा महामार्ग प्रकाशमान कधी होणार..?
एरंडोल: तूम्ही काय दिवे लावले..? असा सवाल ग्रामपंचायत व नगरपालिका पातळीवर सत्तारूढ लोकप्रतीनिधींना विरोधकांकडून केला जातो पण दिवे का लावणार यापेक्षा महामार्गावरील दिवे प्रकाशमान कधी करणार..? असा सवाल जनतेकडून केला जात आहे. येथे धरणगाव चौफुलीवरील तसेच दत्तमंदिराजवळील भराव पूल या दोन्हीं ठिकाणी पथदिव्यांसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून स्तंभ उभारण्यात आले आहेत मात्र हे दिवे प्रकाशमान कधी होणार..? दिवे कधी लावले जाणार..?…
Read More »