म. जा. न्युज नेटवर्क
एरंडोल: येथील पारधी वाड्यात डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.हितेश देविदास पारधी,वय ११ वर्षे हा मुलगा संशयित रुग्ण आहे.जळगांव येथील निरामय हाॅस्पिटलच्या अहवालात सदर मुलाला डेंग्यूची लक्षणे स्पष्ट झाली असून तो डेंग्यूचा संशयित रुग्ण आहे. असे नमूद केले आहे.
दरम्यान शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल संबंधित यंत्रणा व नगरपालिका प्रशासन यांना प्राप्त झाला नाही असे सांगण्यात आले.
एरंडोल न.पा.चे मुख्याधिकारी अमोल बागुल हे विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत.बागुल यांनी संशयित रुग्ण आढळून आलेल्या परिसरात फवारणी करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
शहरात डासांची उत्पत्ती वाढली असल्याने त्या परिसराची साफसफाई करण्याची मोहीम न.पा.तर्फे राबवण्यात येत आहे.शहरात तापाचे रूग्ण आढळून आल्यास त्वरित न.पा.कार्यालय व एरंडोल ग्रामीण रूग्णालय यांच्याशी संपर्क साधून योग्य त्या उपाययोजना व उपचार करून घ्यावेत असे आवाहन शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे.