बातमी

  • घरफोडी व वाहन चोरी प्रकरणातील तीनही आरोपी जेरबंद..!

    म.जा.न्युज नेटवर्क जळगाव: शहरातील भुसावळ रोड वरील चांडक हॉस्पिटल मागील गोल्ड सीटी येथे वास्तव्यास असणाऱ्या कुंदन भटू सोनी यांच्या घराच्या बाल्कनी ची खिडकी तोडून घरातून ७५हजारांचा मुद्देमाल तसेच २मोबाइल- अंदाजित किंमत १लाख ३४हजार असा ऐवजावर डल्ला मारल्याप्रकरणी एम.आय.डी.सी पोलिस स्टेशन ला भा.न्याय.संहिते च्या कलम ३३१(४)३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हेगारांवर शहादा जि.नंदुरबार येथे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल…

    Read More »
  • शास्त्री फार्मसीत महापरिनिर्वाण दिनी ‘ज्ञानमहासागरास, वाहण्यात आली आदरांजली..!

    म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: तालुक्यातील पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त शास्त्री इन्स्टिट्युट चे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी आदरांजली वाहिली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. शास्त्री यांनी सांगितले की येवढ्या बिकट परिस्थितीत सुद्धा बाबासाहेबांनी एवढे उच्च शिक्षण घेऊन समाज प्रबोधन केले हा…

    Read More »
  • शास्त्री फार्मसी इन्स्टिट्युट तर्फे एड्स जनजागृती रॅली चे आयोजन..!

    म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: तालुक्यातील पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत ०६ डिसेंबर २०२४ रोजी  शासकीय ग्रामीण रुग्णालय एरंडोल यांच्या सैयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामीण रुग्णालय एरंडोल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक जाधव होते, कार्यक्रमाच्या सुरवातीला वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल वानखेडे यांनी जनजागृति प्रभात फेरीस रवाना केले. शास्त्री फार्मसिच्या सर्व विद्यार्थ्यांनी व…

    Read More »
  • शास्त्री इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीत संविधान दिवस साजरा..!

    म.जा.न्युज नेटवर्क एरंडोल: तालुक्यातील पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीत २६नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु असल्याने, प्रत्येक प्रात्यक्षिक वर्गात स्वतंत्रपणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रा.करण पावरा यांनी केले तसेच भारतीय संविधानाप्रति एकनिष्ठतेची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य…

    Read More »
  • एरंडोल येथे आढळला ११ वर्षीय ‘डेंग्यू, संशयित..!

        म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: येथील पारधी वाड्यात डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.हितेश देविदास पारधी,वय ११ वर्षे हा मुलगा संशयित रुग्ण आहे.जळगांव येथील निरामय हाॅस्पिटलच्या अहवालात सदर मुलाला डेंग्यूची लक्षणे स्पष्ट झाली असून तो डेंग्यूचा संशयित रुग्ण आहे. असे नमूद केले आहे. दरम्यान शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल संबंधित यंत्रणा व नगरपालिका प्रशासन यांना प्राप्त झाला…

    Read More »
  • सुमारे २९ वर्षांनंतर एरंडोल येथील काबरे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची भरली ‘शाळा,

    म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: येथील रामनाथ तीलोकचंद काबरे विद्यालयात शिक्षण घेतलेल्या व तब्बल २९ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर म्हणजेच सन १९९५ च्या इयत्ता दहावी “अ” च्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी शाळेच्या प्रांगणात रांगोळी फुले व फुग्यांची आकर्षक अशी सजावट तसेच विविध नेत्रदीपक वस्तूंनी वर्ग सजविण्यात आला होता. सर्वप्रथम जमलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा…

    Read More »
  • पाच लाखांची लाच घेऊन सेवा वर्ग केल्याचा प्रांताधिकारी गोसावींवर आरोप, गोसावींच्या बदल्यांना आक्षेप, व चौकशीची गुप्ता यांची मागणी

    म.जा.न्युज नेटवर्क जळगाव: शासन नियम व आदेशाविरुद्ध नियमबाह्य प्रती नियुक्तीवर बदली करण्याबाबत येथील प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता यांनी विभागीय महसूल आयुक्त, नाशिक विभाग यांना पत्र लिहून ही तक्रार केली आहे.   गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, महसूल व वन विभाग मंत्रालयाने सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिलेल्या…

    Read More »
  • एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात रिमोट हीच आमची संवादाची साधने आहेत का ..     राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचा एरंडोल येथील कार्यक्रम प्रसंगी सवाल 

    म.जा.न्यूज नेटवर्क एरंडोल:-एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात रिमोट हीच आमची संवादाची साधने आहेत का यातून सूजन नागरिक कसे तयार होणार असा अंतर्मुख करणारा सवाल रूपालीताई चाकणकर यांनी येथे केला. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी.डी.एस.पी महाविद्यालयात १८ सप्टेंबर २०२४ बुधवार रोजी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी युवतींशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा…

    Read More »
  • एरंडोल तालुक्यातून ७९ समाजउपद्रवी तीन दिवसांसाठी हद्दपार..!

    म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: गणपती विसर्जन मिरवणूक (अनंत चतुर्दशी) व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने एरंडोल तालुक्यातील व शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वधर्मीय सण उत्सव शांततेत पार पडावेत याकरिता एरंडोल तालुक्यातील ७९ उपद्रविंना दिनांक १७सप्टेंबर ते १९ सप्टेंबर असे तीन दिवस हद्दपार करण्यासाठी एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) यांना प्रस्ताव…

    Read More »
  • एरंडोल येथे पोलिसांचे पथसंचलन..!

     म. जा.न्युज नेटवर्क एरंडोल: येथे गणेश विसर्जन व ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार कोठेही घडू नये यासाठी शहरातील प्रमुख भागांत एरंडोल पोलीसांकडून रूट मार्च काढण्यात आला. या पथसंचलनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल नंदवाळकर,पोलिस निरिक्षक सतीश गोराडे,सहायक पोलिस निरीक्षक शंकर पवार,पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या सह पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी…

    Read More »
Back to top button
Translate »