म. जा. न्युज नेटवर्क
एरंडोल: गणपती विसर्जन मिरवणूक (अनंत चतुर्दशी) व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने एरंडोल तालुक्यातील व शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वधर्मीय सण उत्सव शांततेत पार पडावेत याकरिता एरंडोल तालुक्यातील ७९ उपद्रविंना दिनांक १७सप्टेंबर ते १९ सप्टेंबर असे तीन दिवस हद्दपार करण्यासाठी एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यावरून एरंडोल शहरातील व तालुक्यातील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील एकूण ७९ इसमांना १७सप्टेंबर ते १९ सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत तीन दिवसांकरिता हद्दपार करण्याचे प्रस्ताव पारित झाल्याने संबंधितांना आदेश बजावण्यात आले.
सदर आदेशांची बजावणी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर पवार,पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,पोलीस नाईक मिलिंद कुमावत,पोलीस शिपाई आकाश शिंपी यांनी केली.