एरंडोल तालुक्यात ग्रामीण भागात ३६हजार ९५४ कुटुंबांचे सर्वेक्षण, जवखेडे बु! येथील ७ भिल्ल समाजाच्या कुटुंबांचा सर्वे करण्यास नकार..!
(प्रतिनिधि)
एरंडोल: तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले असून ३६हजार ९५४ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात मागासवर्गीय कुटूंब २७हजार ७५० असून खुल्या वर्गाची कुटूंब संख्या ९हजार २०४ इतकी आहे.
दरम्यान,
जवखेडे बुदृक येथील भिल्ल समाजाच्या सात कुटुंबांनी सर्वे करण्यास नकार दिलेला आहे. सर्वे करण्यास नकार देण्याचे कारण सांगण्यात आले नसल्याची माहिती एरंडोल तहसील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वेक्षणाचे काम २७१ प्रगणकांनी केले.२७पर्यवेक्षकांनी पर्यवेक्षणाचे काम केले. तहसीलदार सुचिता चव्हाण, नायब तहसीलदार दिलीप पाटील व अव्वल कारकून ज्योती चौधरी यांनी सर्वेक्षणाच्या कामासाठी मार्गदर्शन केले.
एरंडोल तालुक्याच्या ग्रामीण भागात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण कुटूंब संख्या २७हजार ९० इतकी आहे मात्र गेल्या १२वर्षांत लोकसंख्या वाढल्यामुळे कुटुंबांच्या संख्येत वाढ झाली आहे म्हणून कुटूंबांची माहिती संकलित करण्याचे काम १३६%झाल्याचे सांगण्यात आले.
एरंडोल येथे १००टक्के सर्वेक्षण पुर्ण..!
एरंडोल: येथे गेल्या आठ दिवसांपासून सूरू असलेले कुटुंबांचे सर्वेक्षण १०० टक्के पुर्ण झाले. एकूण ६२ प्रगणकांनी सर्वेक्षणाचे काम केले तर पर्यवेक्षक म्हणून चार अधिकारी कार्यरत होते. नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर ट्रेनर म्हणून हितेश जोगी यांनी काम पाहिले.
एकूण ७हजार ५८७ कुटुंबांचे शहरात सर्वेक्षण करण्यात आले त्यात ६हजार २१४ मागासवर्गीय कुटुंबे असून खुल्या वर्गातील कुटुंबीयांची संख्या १३७३ इतकी आहे.