म .जा.न्युज नेटवर्क
एरंडोल: गिरणा नदीच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून अंजनी धरणाचे पुनर्भरण सुरु असून सद्यस्थितीत ६१टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झालेला आहे त्यामुळे एरंडोल व कासोदा या मोठ्या गावांच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीव्रतेने जाणवणारी पाणीटंचाई ची समस्या आगामी उन्हाळ्यात जाणवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कारण गेल्या वर्षी ‘अंजनी, त पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता. परंतू सलग चार ते पाच दिवस भर उन्हाळ्यात अंजनी नदीपात्रात धरणगाव शहराकरिता पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने एरंडोलकरांना आठवड्यातून एकदाच अत्यल्प वेळ पाणी पुरवठा केला जात होता. त्याची पुनरावृत्ती जर आगामी काळात झाली तर पुनर्भरणाने अंजनी धरण शंभर टक्के भरूनही एरंडोलकरांच्या घश्याला कोरड पडण्याची वेळ येऊ नये अशी सुजाण नागरिकांची भावना आहे.
एरंडोल हे तालुक्याचे शहर असून जवळपास ४०हजार लोकसंख्येचे शहर आहे. या शहरासाठी गेल्या वर्षी अंजनी च्या जलसाठ्यातून १२० एम्.सी.एफ.टी पाणी आरक्षित करण्यात आले होते. एरंडोलकरांना दररोज ५एम्.एल.टी इतक्या पाण्याची गरज भासते. तसेच कासोदा हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून या गावाची तहान अंजनी धरणाच्या जलसाठ्यातून होतें.
*यावर्षी ही तसंच नका करू हो गुलाबभाऊ…*
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कृपेने गेल्या वर्षी प्रमाणे धरणगाव शहरासाठी व ग्रामीण भागाकरीता अंजनी नदीपात्रातून पाणी सोडण्यात आले होते त्याऐवजी शासनाकडून धरणातून पाईपलाईन टाकण्याची योजना राबवली जावी जेणेकरून अंजनी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची नासाडी टाळणे सहज शक्य होणार आहे असे जाणकारांचे मत आहे.