कला व संस्कृतीखांन्देशबातमीमहाराष्ट्र

सुमारे २९ वर्षांनंतर एरंडोल येथील काबरे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची भरली ‘शाळा,

म. जा. न्युज नेटवर्क

एरंडोल: येथील रामनाथ तीलोकचंद काबरे विद्यालयात शिक्षण घेतलेल्या व तब्बल २९ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर म्हणजेच सन १९९५ च्या इयत्ता दहावी “अ” च्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी शाळेच्या प्रांगणात रांगोळी फुले व फुग्यांची आकर्षक अशी सजावट तसेच विविध नेत्रदीपक वस्तूंनी वर्ग सजविण्यात आला होता. सर्वप्रथम जमलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा व हजेरी घेऊन शालेय जीवनाची पुनरावृत्ती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र काबरे, मुख्याध्यापिका कल्पना झंवर,सेवानिवृत्त शिक्षकवृंद के.पी बिर्ला, गोविंद एन.लढे, शालिनी कोठावदे, शोभा पाटील यांच्यासह निवृत्त शिपाई भाऊराव बेहेरे व गोरे भाऊसाहेब या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनासह विद्येची देवता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ.शीतल पाटील यांच्या भक्तीगीताने कार्यक्रमास सुरुवात झाली.उपस्थित मान्यवरांचे स्वागत माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र काबरे यांनी माजी विद्यार्थ्यांची झालेली प्रगती पाहून समाधान आणि आनंद व्यक्त केले. या वर्गातील विद्यार्थी हे शिक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी, बँकिंग, उद्योग, व्यापार, राजकीय, आधुनिक शेती अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून यामुळे शाळेचे नावलौकिक होत असल्याचे सांगितले.माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला भेटवस्तू देण्यात आली तसेच आगामी काळात देखील शाळेला भरीव योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी उपस्थित निवृत्त शिक्षकांनी मार्गदर्शन केले तर अनेक माजी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील आठवणी सांगताना गहिवरून आले होते. आज आमच्या जीवनात झालेल्या प्रगतीचे श्रेय हे शाळेचे व गुरुजनांचे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळेचे दिवंगत सेवानिवृत्त शिक्षक डी.एम.जैन यांच्या स्मृती प्रित्यर्थ नितीन जैन यांनी रु.५००० चा धनादेश दिला.

जुन्या बालमित्रांसोबत प्रदीर्घ काळानंतर झालेल्या भेटीचा आनंद यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता… यावेळी गावातील तसेच बाहेरगावाहून आलेले सुमारे ३० विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद साळी यांनी तर प्रास्ताविक किशोर मोराणकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी अतुल महाजन, केशव ठाकूर, गणेश महाजन, परेश बिर्ला, लीना देशमुख, शिल्पा कोठावदे, सुचिता मुडावदकर, धनंजय खैरनार, भिकन वाल्डे, निलेश बाहेती, अमित बिर्ला, वासुदेव तोतले, प्रेरणा मैराळ, कांचन चौधरी, वैशाली पवार, श्रद्धा बिर्ला, अमोल शहा, आशिष मानुधने, अमोल साळी, जगदीश वंजारी, सपना पलोड, सोनाली लढे, भाग्यश्री वाल्डे, सुनिता शिरोळे, नितीन विसपुते, चेतन कदम आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »