कला व संस्कृतीखांन्देशबातमीमहाराष्ट्रवैद्यकीयसामाजिक
शास्त्री इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीत संविधान दिवस साजरा..!
म.जा.न्युज नेटवर्क
एरंडोल: तालुक्यातील पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीत २६नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु असल्याने, प्रत्येक प्रात्यक्षिक वर्गात स्वतंत्रपणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रा.करण पावरा यांनी केले तसेच भारतीय संविधानाप्रति एकनिष्ठतेची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ.रूपा शास्त्री यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले सोबतच उप प्राचार्य डॉ.पराग कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.