जळगाव चे आमदार सुरेश मामा भोळे यांच्या वाहनावर दंडात्मक कारवाई..!
प्रतिनिधी
जळगाव: शहर विधानसभेचे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे यांच्या वापरात असलेल्या वाहनावर जळगाव वाहतूक शाखेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेतर्फे ई – चलनाच्या माध्यमातून आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम अद्याप भरण्यात आलेली नाही.
सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक कुमार पी.गुप्ता यांनी याबाबत वाहतूक शाखेकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती.
सर्वसामान्य वाहन चालकांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू असताना आमदाराच्या वापरात असलेल्या वाहनावर कारवाई का होत नाही..?
अशी कुजबूज जनमानसात असल्याने रुपये ५०० ही रक्कम आमदारांसाठी थोडकी जरी असली तरी देखील अजून ‘अनपेड, च दिसत आहे. परंतू कायदा सर्वांसाठी समान आहे असा संदेश या कारवाई च्या माध्यमातून जनसामान्यांत पोहोचला आहे.
आ.राजूमामा भोळे वापरत असलेले एम.एच.१९ डी.व्ही. १ हे वाहन त्यांच्या पत्नी सीमा सुरेश भोळे यांच्या नावावर असून फॅन्सी नंबर प्लेट मुळे संबंधीत वाहनावर कारवाई करण्यात आली तसेच आ.भोळे वापरत असलेल्या या वाहनावर अशोकस्तंभाचे स्टिकर अजूनही तसेच आहे.
असले स्टिकर असलेले वाहन वापरण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपती,कॅबिनेट मंत्री, लोकसभा व राज्यसभेचे स्पिकर्स सोबतच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनाच असताना आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे यांच्या वाहनावर अशोकस्तंभाचे स्टिकर कायम असून जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी त्यांना हे स्टिकर काढून टाकण्याबाबत समज दिली होती असे कळते. मात्र त्यानंतर देखिल त्यांनी आपल्या वाहनावर असलेले अशोकस्तंभाचे स्टिकर कायम ठेवलेले आहे.
आमदार भोळे यांच्या वाहनावर फॅन्सी नंबरप्लेट प्रकरणी जशी कारवाई करण्यात आली तशी कारवाई त्यांच्या वाहनावर असलेल्या अशोकस्तंभाच्या स्टिकर वापराबाबत होणार काय..? हे औत्सुक्याचे ठरणार आहे.