वैद्यकीय

रोज रात्री हळदीचं दूध पिता? ५ त्रास असतील तर चुकूनही पिऊ नका हळदीचं दूध, आजारी पडाल.

हळदीच्या दूधाला गोल्डन मिल्क (Golden Milk) असंही म्हटलं जातं. हिवाळ्याच्या दिवसांत हळदीच्या दूधाचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. हळदीचे दूध प्यायल्याने सर्दी,खोकला यांसारखे आजारही उद्भवत नाहीत.(Turmeric Milk Benefits) हळदीचे दूध प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. दुधात प्रोटिन्स,लिनोलिक आणि ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात जे चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

दूधात कॅल्शियम, व्हिटामीन डी, व्हिटामीन बी-१२, पोटॅशियम, फोस्फोरस आणि सेलेनियम भरपूर असते. यात व्हिटामीन ए, झिंक, मॅग्नेशियम, व्हिटामीन बी-१२ असते. हळदीचे दूध प्यायल्याने त्वचेची चमक दुप्पटीने वाढते, पचनक्रिया चांगली राहते. हळदीतील करक्यूमिन प्लाक साफ करण्यास मदत करते. करक्यूमिन कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते.

पण काही स्थितीत हळजीचं दूध पिणं टाळलेलंच बरं कारण यामुळे तब्येतीच्या इतर समस्या वाढू शकतात.

हळदीचे दूध कोणी पिऊ नये?

आहारतज्ज्ञांच्यामते ब्लड प्रेशर कमी असलेल्या रुग्णांनी जास्त प्रमाणात हळदीचे दूध पिऊ नये. कारण यामुळे ब्लड प्रेशर अधिकच कमी होऊ शकते. हळदीतील करक्यूमिन नावाचे केमिकल डायबिटीक रुग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकते अशावेळी हळदीचे दूध पिणं टाळा.

१) मेडिकल न्यूज टुडे च्या रिपोर्टनुसार ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी हळद घातलेल्या दुधाचे सेवन करू नये. हळद शरीराला उष्णता प्रदान करते. यामुळे पोटाचे त्रास उद्भवू शकतात. कारण हळदीतील करक्यूमिन एक्टिव्ह कंम्पाऊंड असून यामुळे अतिसाराचा त्रास होऊ शकतो.

२) शरीरात स्टोन असेल तर हळदीचे दूध पिऊ नये. गॉलब्लॅडर आणि लिव्हरशी संबंधित समस्यांचा सामना करत असलेल्यांनी या दूधाचे सेवन करू नये. अन्यथा त्रास वाढू शकतो.

३) ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. ॲनिमिया त्रास असल्यास हळदीच्या दुधाचे सेवन करू नये. हळदीचे दूध प्यायल्याने रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेवरही काही प्रमाणात परिणाम होतो.

४) गरजेपेक्षा जास्त हळदीचे सेवन करणं शरीरातील एलर्जिक रिएक्शन्सचं कारण ठरू शकतं. रॅशेस, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवू शकतात.

५) प्रेग्नंसीत अनेक गोष्टी खाण्यापिण्यात मनाई असते. प्रेग्नंसीत काहीही खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुम्ही नियमित हळदीच्या दुधाचे सेवन करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानंतर ही सवय सुरू ठेवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »