एरंडोल: येथे आचार्य देव श्रीमद् विजयरत्नसुंदरसुरिश्र्वर जी महाराज यांचे जाहीर प्रवचन पद्मालय फाट्यानजिक श्रीकृपा जिनर्स येथे बुधवारी ३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी साडेआठ ते दहा वाजेदरम्यान होणार आहे अशी माहिती बालाजी उद्योग समूहाचे संचालक संजय काबरा यांनी दिली आहे.
२५वर्षांत पहिल्यांदाच त्यांच्या प्रवचनाचा लाभ मिळत असल्याचे सांगण्यात आले.
तरी या प्रवचनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जैन समाजबांधव व बालाजी उद्योग समूहाचे संचालक दिनेश काबरा, अनिल काबरा, संजय काबरा, शंतनु काबरा, गौतम काबरा, आनंद काबरा,प्रसाद काबरा यांनी केले आहे.