(प्रतिनिधी)चोपडा: येथे प्रसाद नगरात महाराष्ट्र ग्राहक पंचायत चोपडा शाखेची मासिक सभा शांततेत संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी राजुभाई गुजराथी हे होते. याप्रसंगी ग्राहकांची होणारी फसवणूक, सरकारी कामात होणारी दिरंगाई, ग्राहकांवर होणारा अन्याय व होणारी कारवाई अश्या सार्वजनिक विषयांवर सखोल-सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र ग्राहक पंचायत चे जिल्हा सचिव उदय कुमार अग्निहोत्री यांनी ग्रामीण भागात ठिकठिकाणी महाराष्ट्र ग्राहक पंचायत च्या शाखा उघडण्याचे सूतोवाच केले.
यावेळी मागील प्रश्न उपस्थित करून योग्य निर्णय घेण्यात आले तसे ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले.
सभेस जिल्हा सचिव उदय कुमार अग्निहोत्री, चोपडा तालुका सचिव भूपेंद्रभाई गुजराथी, प्रमोद डोंगरे, महेश पोतदार, कैलास महाजन, पृथ्वीराज सैंदाणे, अनिल बारी, विजय पाटील, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन भूपेंद्रभाई गुजराथी यांनी केले तर सभेच्या यशस्वीतेसाठी पृथ्वीराज सैंदाणे यांनी परिश्रम घेतले.