बातमीमहाराष्ट्रसामाजिक

एरंडोल येथे भराव पूलाचा महामार्ग प्रकाशमान कधी होणार..?

एरंडोल: तूम्ही काय दिवे लावले..? असा सवाल ग्रामपंचायत व नगरपालिका पातळीवर सत्तारूढ लोकप्रतीनिधींना विरोधकांकडून केला जातो पण दिवे का लावणार यापेक्षा महामार्गावरील दिवे प्रकाशमान कधी करणार..? असा सवाल जनतेकडून केला जात आहे.
येथे धरणगाव चौफुलीवरील तसेच दत्तमंदिराजवळील भराव पूल या दोन्हीं ठिकाणी पथदिव्यांसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून स्तंभ उभारण्यात आले आहेत मात्र हे दिवे प्रकाशमान कधी होणार..? दिवे कधी लावले जाणार..? असे संतप्त सवाल स्थानिक नागरीक, वाहनचालक व प्रवासी वर्गाकडून केले जात आहेत.

एरंडोल येथे धरणगाव चौफुलीवर वळण असणारा भराव पूल उभारण्यात आला आहे. तसेच शहरालगत दत्तमंदिराजवळ दुसरा भराव पूल उभारण्यात आलेला आहे. महाजन नगरापासून दत्त मंदिरापर्यंत महामार्गावर पथदिव्यांअभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. दोनही ठिकाणी रस्त्यांना वळण असल्यामुळे रात्रीच्या अंधारात आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत त्यासाठी अडीच ते तीन किलोमीटर शहरालगत च्या अंतराच्या महामार्गावर पथदिवे लावणे नितांत गरजेचे आहे याशिवाय अरुंद व अपुऱ्या असलेल्या समांतर रस्त्यांना देखील काळोख मुक्त करावे जेणेकरुन अपघात टाळले जाऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून पथदिवे प्रकाशमान करण्याची साधी आणि सहजगत्या होणारी बाब महामार्ग प्राधिकरणाच्या लक्षात कधी येणार..? पथदिवे सुरु करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या डोक्यात अजूनही प्रकाश कसा पडत नाही..? असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »