महाराष्ट्र जागर न्युज नेटवर्क
(रघुनाथ एस. निकुंभ)
एरंडोल: येथे जय बाबाजी भक्त परिवारातर्फे महाशिवरात्री उत्सव विवीध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजे पर्यंत जवळपास तीन टन उसाचा रस भाविकांना मोफत वाटप करण्यात आला. सुमारे ११हजार भाविक- भक्तांनी लाभ घेतला. एरव्ही सर्वत्र प्रसाद म्हणून साबुदाणा फराळ वाटप केली जात होती मात्र तप्त उन्हात उसाच्या रसाचे प्रसाद स्वरुपात मोफत वितरण झाल्यामुळे या उपक्रमाचे सर्वांनी भरभरून कौतूक केले.
मध्यरात्री परिवाराच्या कार्यकर्त्यांकडून अंजनी नदीकाठावरील महादेवाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करण्यात आला व पहाटे पाच वाजेच्या सुमारास महाआरती करण्यात आली तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महाशिवरात्री साजरी करण्याची या भक्त परिवाराची गेल्या सात वर्षांपासूनची परंपरा कायम राखण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्याचे अध्यक्ष भरत महाजन, पंकज महाजन, काशिनाथ महाजन, विजय महाजन, अनिल महाजन, गणेश मिस्तरी, छोटु मिस्तरी, नाना महाजन, भुरा महाजन, हिरालाल महाजन, रविंद्र महाजन,शरदचंद्र पवार, भिकन महाजन, विशाल महाजन, मनोज महाजन, कुणाल महाजन, दौलत महाजन व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.