बातमीमहाराष्ट्रसामाजिक

मे. इंजिनियरिंग व ए.के एंटरप्रायजेस यांनी केलेल्या कामाचे ऑडिट करावे – सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांची ऑनलाईन तक्रार..!

महाराष्ट्र जागर न्युज नेटवर्क

जळगाव: येथील सामाजिक व विख्यात असे माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार पी.गुप्ता यांनी मे. इंजिनियरिंग व ए.के.एंटरप्रायजेस कंपनी या दोन्ही कंपन्या एकाच मालकाशी संबंधीत असून या दोन्ही कंपन्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचे लेखापरीक्षण करावे अशी ऑनलाईन तक्रार ९ फेब्रुवारी २०२४ रोजी केली आहे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

 

ऑनलाईन तक्रारीत म्हटले आहे की,

महावितरण, जळगाव परिमंडळात असलेल्या औद्योगिक वसाहत परीसर आणि इतर काही भागातील ग्राहकांच्या नियमित विजवापराचे युनिट तपासून विज वितरीत करण्याचे काम मे.इंजिनियरिंग आणि ए. के. एंटरप्रायजेस कंपनीकडे आहे. गेल्या दहा वर्षांपासून एकाच कंपनी च्या मार्फत काम केले जात असून काही वर्षांपूर्वी मे. इंजिनियरिंग कंपनी कडून एकाच कामासाठी चार वेळा बिल सादर केल्याची माहिती पुढे आली होती.

मे. इंजिनियरिंग आणि ए.के. एंटरप्रायजेस कंपनी या एकाच मालकाशी संबंधीत आहेत. दोन्हीं कंपन्यांच्या आजवर केलेल्या कामाचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणी ऑनलाईन तक्रारीव्दारे करण्यात आली आहे.

 

सदर दोन्हीं कंपन्यांकडून सर्वात आधी केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून अनुभव प्रमाणपत्र आणि बँक गॅरंटी देखील तपासण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »