आरोग्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि आपल्या वैद्यकीय विद्याशाखेच्या व्यापक योगदानाची नोंद करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी संपूर्ण जगात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जगावर आरोग्य विषयक कार्य करणे, विविध योजना राबवणे आदी सेवा बजावल्या जातात या संस्थेच्या मते आरोग्य हे मानवी कल्याणासाठी मूलभूत गरज आहे. जागतिक लसीकरण सप्ताह, जागतिक मलेरिया दिवस,जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक रक्तदाता दिन,जागतिक हिपॅटायटीस दिवस, जागतिक क्षयरोग दिन यासह WHO द्वारे राबवली जाणारी जागतिक आरोग्य दिन ही मोहीम एक चळवळ आहे.
विसाव्या शतकातील जागतिक आरोग्य दिनाची थीम ‘आपला ग्रह, आपले आरोग्य’ ही होती . आपल्या भारतात या वर्षी डब्ल्यूएचओ ने तातडीने जागतिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी मानवास सुखी आनंदी व निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक कृती आणि एक चळवळ तसेच प्रोत्साहन देत आरोग्य लक्ष केंद्रित समाज निर्माण करेल असा आशावाद व्यक्त केला आहे. रोगांना प्रतिबंधित करणे किंवा नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणे,लसीकरण करून किंवा त्यांची सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होऊन आरोग्यदायी आहार व्यायाम आणि फिटनेस यांचे महत्त्व लोकांना समजावून आदी कार्यक्रम राबवत जनजागृती करणे आदी उद्दिष्टे आखली आहेत.
समर्पित वैद्यकीय सेवा व सुविधा तसेच वैद्यकीय शैक्षणिक भूमिका त्याचबरोबर मधुमेह आणि उच्च रक्तदाब तसेच क्षयरोगाच्या उपचारातील त्रुटी व उपाययोजना आखल्या आहेत. निरोगी जीवनाची सोय करणे म्हणजे ग्रहाचा आनंद घेण्यासाठी योग्य जीवन, निरोगी जीवन जगणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो आत्म्याने आणि प्रामाणिकपणाने आचरणात आणला पाहिजे. या वर्षी मानवाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या तातडीच्या कृतींवर जागतिक लक्ष केंद्रित करून निरोगी समाजाची निर्मिती करण्यासाठी चळवळ वाढवण्यासाठी प्रत्येकासाठी अधिक चांगले आणि निरोगी जग’ निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेवत 2024 सालाची जागतिक आरोग्य दिनाची थीम “युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज” अशी व्हावी. आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क आहे आणि या कल्पनेवर जोर देण्यात यावा. प्रत्येकाला आरोग्य सेवेचा लाभ मिळू शकला पाहिजे.
1948 मध्ये स्थापन झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य सभा 1948 मध्ये जिनिव्हा येथे प्रथमच आयोजित करण्यात आली होती. 1950 मध्ये, जागतिक आरोग्य दिन प्रथमच जगभरात साजरा करण्यात आला. असा हा महत्त्वाचा दिवस जगात साजरा केला जातो. कोरोना महामारी, टी-बी , कॅन्सर, एच आय व्ही संक्रमण, कृष्टरोग व पोलिओ आदी सारखे अती गंभीर रोग भारतात डोकं वर काढू नये तसेच या आजारांच्या निवारणासाठी आरोग्यविषयक कार्य,प्रयत्न,प्रचार, आस्था आणि चळवळ वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असायला हवे. जेणेकरून महामारीत, जागतीक संकटात आरोगयसंपन्न जीवन जगता यावे आणि आरोग्यासारखी च मूलभूत गरज म्हणून भारताने या आरोग्याकडे पाहावं ही आशा.