खांन्देशतंत्रज्ञानपोलिसबातमीमहाराष्ट्र

गुन्ह्याच्या तपास कामी उत्कृष्ट कामगिरी बद्दल एरंडोल पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल सह पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव..!

एरंडोल: येथे अल्पवयीन मुली बाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना केवळ एका मोबाईल कॉल चा सतत दोन महिने पाठपुरावा करून व तांत्रिक विश्लेषणाआधारे आरोपीस मुलीसह जोधपुर (राजस्थान) येथून ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्याची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येथील पोलीस उपनिरीक्षक शरद सदाशिव बागल व त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजेश पंडीत पाटील, काशिनाथ पाटील,पंकज पाटील यांचा 17 मे 2024 रोजी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीत प्रशंसा पत्र देऊन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या सन्मानामुळे एरंडोल पोलीस स्टेशनची शान वाढून मान उंचावली असून सर्व पोलीस सहकार्यांचा उत्साह वृद्धिंगत झाला आहे.

एरंडोल पोलीस स्टेशनला २०२३ मध्ये भा.दं.वि.कलम ३५३ मधील अल्पवयीन मुली संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती हे आव्हान पीएसआय बागल व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वीकारून केवळ एका मोबाईलवरील कॉल च्या आधारे सतत दोन महिने पाठपुरावा केला.

विशेष हे की या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषण करून सदर अल्पवयीन मुलीस व आरोपीस राजस्थान येथून एरंडोल पोलीस स्टेशनला आणण्यात आले या गुन्ह्यात पुढे पॉक्सो कलमान्वये वाढ करण्यात आली असून आरोपी हा गेल्या नऊ महिन्यांपासून जिल्हा कारागृहात आहे. तसेच जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सब गव्हाण टोल नाका जाळपोळ प्रकरणातील आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेली कार सुरत येथून हस्तगत करण्यात आली या कामाबद्दल पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या पथकाने गुन्हा उघड करण्यात यश मिळविले त्याबद्दल जळगाव चे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याकडून त्यांना गौरवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »