एरंडोल येथे ‘माहिती अधिकार, कार्यकर्त्यांकडून विविध शासकीय कार्यालयांना निवेदन सादर..!
म.जा. न्युज नेटवर्क
एरंडोल: येथे माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून नगरपालिका,पोलिस स्टेशन,पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय आदि विवीध शासकीय आस्थापनांना २८सप्टेंबर २०२४ हा दिवस ‘माहिती अधिकार दिन, म्हणून साजरा करण्यात यावा या आशयाचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात सर्व सामान्य नागरिकांस हक्क प्रदान करणारा महत्त्वपुर्ण असा माहिती अधिकार अधिनियम- २००५ हा कायदा असून या कायद्याचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी शासन व प्रशासनाची असून या कायद्याचे महत्व व उपयोगिता सर्व शासन अधिनस्थ कार्यालये, संस्था यांतील कर्मचाऱ्यांना तसेच सर्वसामान्यांना असावे याकरीता २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा.
तसेच सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई कडील २०सप्टेंबर २००८ रोजी चा शासन निर्णयाचा संदर्भ नमूद असून
तालुकाध्यक्ष सिताराम मराठे, तालुका उपाध्यक्ष तुषार शिंपी, संपर्क प्रमुख नितिन ठक्कर, सक्रिय सभासद राजधर महाजन, प्रचार संयोजक आर.एस.निकुंभ, प्रचार समन्वयक विज्ञान पाटील, प्रचार सहसमन्वयक अंकुश चव्हाण, प्रभाकर महाजन,अण्णा सोनवणे,राहूल महाजन, सुनिल माळी,भूषण चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.