माझी बांधीलकी राजकारणा ऐवजी समाजकारणाला प्राधान्य देणारी.. ___ सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन
म.जा.न्युज नेटवर्क
एरंडोल: मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्ती असून माझ्या परिवाराला कोणताही राजकीय वारसा नाही. केवळ जनतेची सेवा करणे या ध्येयाने प्रेरित होऊन मी विधानसभा निवडणूक लढवीत आहे.आतापर्यंत या मतदार संघाचे नेतृत्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडे होते.यावेळी कोणीतरी अपक्ष उमेदवार म्हणून परिवर्तनासाठी पुढे यावे अशी जनतेकडून मागणी झाल्याने मी अपक्ष उमेदवारी करण्याचे ठरविले आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन यांनी एरंडोल येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना केले.
एरंडोल शहर पत्रकार संघातर्फे भगवान महाजन यांचा वार्तालाप कार्यक्रम १ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला.या वेळी पत्रकारांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाबाबत विविध प्रश्न महाजन यांना विचारले असता त्यांनी समर्पक अशी उत्तरे देऊन आपली समाजकारणाची भुमिका विशद केली.
यावेळी पत्रकार प्रा.शरद महाजन यांना राज्यस्तरीय बाळकडू व्यंगचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच माहिती अधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सन्मानाचे मानकरी राजधर महाजन यांचाही सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस चौधरी यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत उमेश महाजन यांनी केले.पत्रकार संघाचे उपाध्यक्ष उदय पाठक,कुंदन ठाकूर,प्रविण महाजन, प्रमोद चौधरी,पंकज महाजन यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहराध्यक्ष कैलास महाजन यांनी केले तर आभारप्रदर्शन शैलेश चौधरी यांनी केले.