वैद्यकीय

मायग्रेन आणि त्यावरील उपाय

डोकेदुखी हा आजार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. जीवनशैलीमुळे होणारा त्रास म्हणजे मायग्रेन त्यालाच आपण अर्धी डोकेदुखी म्हणतो. अमेरिकेतील प्रत्येकी पाच महिलांपैकी एका महिलेला हा त्रास होतो तर यूके मध्ये चार पैकी एक महिलेला मायग्रेनने त्रस्त केले आहे. भारता मध्ये ह्या मायग्रेनचा त्रास बर्‍याच लोकांमध्ये आढळतो.

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त असते. हा आजार साधारणत: २० ते ४५ वयोगटातल्या लोकांना जास्त प्रमाणात होतो. ५० वर्षांवरील वयाच्या लोकांना हा होत नाही. हा त्रास उच्चभ्रू लोकांना जास्त होतो. फिल्ड मध्ये २५ टक्के मुलांमध्ये हा त्रास असतो. असा जीवघेणा हा त्रास आहे. हा आजार ठीक करण्यास त्रासदायक असून ही एक जागतिक समस्या आहे. परंतु ह्यावर निश्चित उपचार उपलब्ध नाही. आयुर्वेदाने ह्याचा उपचार शक्य आहे.

लक्षणे

१) ह्या आजारात तीव्र स्वरूपाची डोकेदुखी असते.

२)डोक्याच्या अर्ध्या भागातच डोकेदुखी असते.

३)वेदना हळूहळू वाढत जातात, हालचालीने वेदना वाढतात.

४)काही लोकांना डोकेदुखी सोबतच मळमळ होणे, उलटी होणे, आवाज सहन न होणे, प्रकाश सहन न होणे ही लक्षणे आढळतात.

५)हा त्रास साधारणत: २४ ते ७२ तासांपर्यंत टिकून राहतो.

६)स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी किंवा हार्मोन्स प्रमाण कमी जास्त होण्याने हा त्रास होतो.

७)काही रुग्णा मध्ये डोकेदुखी होण्याच्या पूर्वी स्वत:ला होणार्‍या ठराविक लक्षणावरून माहित पडते की, त्यांना मायग्रेनचा अटॅक येणार आहे.

उपचार

आयुर्वेद शास्त्रानुसार आम्लपित्त, अजीर्ण ह्याची जी कारणे व लक्षणे सांगितलेली आहेत, तीच कारणे व लक्षणे ह्या आजारात पाहायला मिळतात. ह्या आजारात शरीरातील दोष व लक्षणे बघून नाडीपरीक्षा करून विशिष्ट प्रकारची शोधन चिकित्सा केली तर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. मायग्रेन मध्ये दोषानुसार, वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य ह्यापैकी एका शोधन चिकित्सेचा उपयोग केल्यास फायदा होतो. ह्या आजारापासून सुटकाही होऊ शकते. काही दिवस आयुर्वेदातील पथ्यादी काढा, प्रवाळ पिष्टी इत्यादी सारखी औषधी सुद्धा घेतल्याने हा त्रास बरा होतो.

कारणे

आता पर्यंत जे काही ह्या आजारावर संशोधन झाले आहे, त्यानुसार ह्या आजाराचे निश्चित कारण किंवा तपासणी सांगता येत नाही. परंतु खाली दिलेली काही कारणे ह्या आजाराला उत्पन्न करतात.

अवेळी जेवण, भूक नसताना जेवणे व उपवास,अनियमित झोप,अति झोप,कमी झोप,अति प्रवास,जेवण करताना जास्त पाणी पिणे,तिखट (spicy) जेवण नियमित घेणे,pain killers चा अधिक वापर (रुग्ण स्वत: मनाने करतात),कुटुंब नियोजनार्थी वापरण्यात येणारी औषधी, हार्मोन्स थेरपी इत्यादी,आनुवंशिकता (hereditary),सूर्यप्रकाशात जास्त फिरणे,चिंता,कामाची घाई,पचायला जड असणारे पदार्थ खाणे,मनात नेहमी छोट्या गोष्टींचा विचार करत राहण्याची सवय.

घरगुती उपाय

सकाळी ४ वाजता उठून २ जिलेबी व दूध पिऊन झोप घ्यावी. ह्याने डोकेदुखी बंद होते.

या प्रमाणेच दुधमलई व साखर घेतल्याने फायदा होतो.

झोप पूर्ण घ्यावी. व्हिटॅमिन B-Complex घ्यावे. रात्री जागरण टाळावे. खोबर्‍याच्या तेलाने डोक्याची हळूवार मालिश करावी. पत्ताकोबीच्या पानाने मानेला व डोक्याला बांधून ठेवल्याने हा त्रास कमी होतो. जेवण वेळेवर घ्यावे. झोपताना टीव्ही बघू नये,शिवाय ह्या रुग्णांनी नेहमी अंधार असलेल्या खोलीतच झोपावे. मानेचा स्ट्रेचिंग व्यायाम करावा. बर्फाच्या गोळ्याने शेकल्यावर मायग्रेन बरा होतो. अद्रक किंवा सुंठ खाल्यास अजीर्णजन्य मायग्रेन बरा होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »