(प्रतिनिधि)
चोपडा: महाराष्ट्र ग्राहक पंचायत राज्य कार्यकारीणीने तयार केलेल्या दिनदर्शिके चे प्रकाशन १ फेब्रुवारी २०२४ रोजी चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शन केंद्र ग्रामीण भागात सुरू करण्याबाबतच्या संकल्पनेस तहसीलदार थोरात यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले.
चौगांव येथील ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रस्तावित असलेल्या ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्या उद्धघाटनाचे निमंत्रणही स्वीकारले.
नंतर शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, बस स्थानकप्रमुख, गट विकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी आदी शासकीय कार्यालय प्रमुखांना त्यांच्या कार्यालयात दिनदर्शिकेच्या प्रती देण्यात आल्या. या माध्यमातून शासन भेटीच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती देऊन ” महाराष्ट्र ग्राहक पंचायत शासन दरबारी ” हे अभियान यशस्वी केले.