चाळीसगाव येथील माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ल्या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
तर गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात
चाळीसगाव: येथील माजी नगरसेवक बाळासाहेब(महेंद्र)मोरे यांच्यावर अज्ञात हल्लखोरांकडून बेछूट गोळीबार केल्याची घटना बुधवारी पावणे पाच वाजेच्या सुमारास हनुमान वाडी भागात घडली होती. या हल्ल्यात मोरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी ७ जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न व कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अजय संजय बैसाणे यांच्या फिर्यादीवरून १) गुड्डू उर्फ उद्देश शिंदे (रा. हिरापुर),२)सचिन गायकवाड(चाळीसगाव),३)अनिस शेख शरीफ शेख (हुडको कॉलनी, चाळीसगाव), ४)सॅम चव्हाण (हिरापुर), ५)भूपेश सोनवणे(चाळीसगाव), ६)सुमित भोसले(चाळीसगाव),७)संता उर्फ संतोष पहेलवान(हिरापुर) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०७, १२०(व),१४३,१४४,१४७,१४८ व १४९ सह शस्त्र अधिनियम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन पोलिस पथकांकडून व स्थानिक गुन्हे शाखेकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान,
हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली गाडी चाळीसगाव पोलिसांनी मध्यरात्री नागद-कन्नड रोडवरील सायगव्हाण रस्त्यालगत बंद पडलेल्या अवस्थेत मिळून आली असून वाहनात 2 जिवंत काडतूसे, 02 खाली केस, एक कोयता मिळून आले आहेत.