खांन्देशमहाराष्ट्र

एरंडोल नगरपरिषदेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती अवतार दिन साजरा..!

म.जा.न्युज नेटवर्क

एरंडोल:राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार मंत्रालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयात थोर व्यक्ती व राष्ट्र पुरुष यांची जयंती साजरी करणे या कार्यक्रमांतर्गत या वर्षापासून महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन भाद्रपद शुक्ल द्वितीया या तिथीनुसार साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज एरंडोल नगरपरिषद येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन प्रतिमा पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी स्वामींच्या प्रतिमेस युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन, कार्यालयीन अधीक्षक विनोद कुमार पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्या काळात मराठी भाषेला प्रमुख भाषेचा दर्जा मिळवून दिला. त्याचप्रमाणे स्त्री पुरुष समानते याविषयी त्यांनी मौलिक संदेश दिला. आपल्या आचरणातून अहिंसेचे महत्त्व व सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करण्याचे शिकवण त्यांनी दिली. त्यांचे विचार व कार्य भावी पिढीसाठी सदैव प्रेरणादायी ठरतील. राज्य शासनाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्याच्या निर्णयाचे सर्व महानुभाव पंथीय वासनिक बांधवांच्या वतीने आम्ही स्वागत करतो असे यावेळी बोलताना अतुल महाजन यांनी सांगितले… याप्रसंगी प्रभाकर सोनार, प्रमोद पाटील, अशोक मोरे, प्रकाश सूर्यवंशी, रघुनाथ महाजन, तुषार शिंपी, संदीप शिंपी, वैभव पाटील, रेखाबाई महाजन, कैलास देशमुख, राजू वंजारी, भरत महाजन यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी व महानुभाव पंथीय वासनिक उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »