राजकारणसंपादकीय

स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या राज्यकर्त्यांचाच जिल्ह्यातील युवतींकडे कानाडोळा — डॉ.धर्मेश पालवे

 

 

(संपादकीय)

जशा महिला घर चालवू शकतात, तशा राज्य आणि देश ही चालवू शकतात. अलीकडे महिलांचा राजकारणात सक्रिय सहभाग वाढत आहे. पूर्वी महिलांना डावलले जात होते. आता मात्र, महिलांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. जर एखादा निर्णय पक्षश्रेष्ठींनी चुकीचा ‌घेतला असेल तर महिला त्याविरोधात आवाज उठवतात. महिला निवडणुकांमध्ये सर्वच पातळीवर जबाबदारी पार पाडत असेल तर तिला उमदेवारी देण्यास हरकत नाही. परंतू राजकीय निर्णय प्रक्रियेत महिलांचा विचारच केला जात नाही. शहरापेक्षा आज ग्रामीण भागातील युवती ही खूप हुशार झाल्या आहेत. त्याही तितक्याच उत्साहाने सहभाग घेत आहेत. युवतींचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. आता कडीपत्याप्रमाणे महिलांना बाजूला केले जात नाही. त्यामुळे राजकारणात महिलांचे अस्तित्व निर्माण करण्यात युवती पुढे सरसावत आहेत.

संसार सांभाळून समाजकार्य करणाऱ्या महिलांची संख्या कमीच असते. म‌हिलांचे सबलीकरण झाले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. राजकारणात युवतींचाही सहभाग वाढत आहे. यावेळच्या निवडणुकीमध्ये युवतींचे मतदान लक्षणीय असेल.त्यांच्या सर्वच अडचणींकडे राजकारणी लोक सर्रास दुर्लक्ष करीत आहेत.यात आता पारदर्शकता आली पाहिजे. त्यासाठी वैचारिक बदल होणे आवश्यक आहे.

 

थोडक्यात….

राजकीय क्षेत्रात नाव करणारे युवक व पुरुष सदस्य हे जसे काम करतात तसे युवती व महिला ही करू शकतील हे समजून घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा मी पाहील आहे की एखादी महिला राजकीय वलयात एकटी असतें तेंव्हा अडी अडचणीत एक स्री दुसऱ्या स्री ला समजून घेण्याची परिस्थिती तयार होते मात्र लिंगभेद हा या वाटा मोकळ्या करू शकत नाही. पुरुषप्रधान संस्कृती नष्ट करून युवतींना ही संधी द्यावी. युवतींना संधी असून ही त्यांचा समावेश करून घेण्यास जिल्ह्यातील नेते किंवा राज्यकर्ते का कमी पडतात..?  किंवा युवती जिल्हयातील राजकारणात सहभाग का घेत नाहीत? याचा विचार केला गेला पाहिजे. युवती किंवा महिला जर या क्षेत्रात आपल काम करत असतील तर वेगळा परिणाम होईल. संपूर्ण महाराष्ट्रात सरकारने विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत. माञ , महत्वपूर्ण भूमिका घेणाऱ्या योजनांमध्ये युवती किंवा महिला यांना डावललेलं आहे. तेव्हा पारदर्शी व प्रामाणिक सरकारची प्रतिमा तयार होण्यास सर्वसमावेशक तत्त्वाचा व युक्त्यांचा वापर करून राज्यकर्त्यांनी जिल्ह्यात युवतींची सदस्य नोंदणी करावी, जिल्ह्यातील सर्वच पक्षप्रमुख,सदस्य, पक्षश्रेष्ठी, पदाधिकारी यांनी युवती व महिला सदस्य यांचा जास्तीत जास्त सहभाग करून घेत युवतींप्रती विश्र्वास ठेवला पाहिजे.

(सदरील लेखाचे लेखक डॉ.धर्मेश पालवे हे असून चित्रपट, नाटक व सामाजिक तथा राजकिय लिखाण करतात.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »